अळूच्या वड्या (Alu Wadi)

 • Post by Priyanka
 • Dec 11, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

अळूच्या वड्या (२५-३० वड्यांसाठी)

साहित्य:
 • अळूची १० पाने (मध्यम आकारची),
 • १ वाटी बेसन,
 • २ चमचे तांदुळाची पिठी,
 • १ छोटा चमचा गूळ,
 • चवीनुसार तिखट व मीठ,
 • चिमूटभर हळद,
 • २ चमचे धने+ जिरे पूड,
 • १ छोट्या लिंबाचा रस,
 • ३ चमचे भाजलेले तीळ,
 • कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती :
 • अळूची पाने स्वच्छ धुवून, कोरड्या फडक्याने पुसून घ्यावीत.
 • पानाचे देठ तोडून, पानाच्या पाठीमागील जास्तीच्या शिरा कात्रीने कापून घ्याव्यात.
 • बेसन, तांदुळाची पिठी, हळद, तिखट, मीठ, धने जिरे पूड, लिंबाचा रस, गूळ हे सर्व एकत्र करून किंचित पाणी घालून एकजीव कालवून घ्यावे.
 • मिश्रण खूप पातळ नसावे.
 • मग अळूचे एक पान घेऊन त्यावर हे मिश्रम पूर्ण पसरवून लावावे.
 • त्यावर दुसरे अळूचे पान उलटे ठेवून त्यावर सुद्धा मिश्रण लावावे.
 • अशाप्रकारे ३-४ पाने एकमेकांवर ठेवून त्यावर पूर्ण मिश्रण लावून, त्याची घट्ट गुंडाळी करावी.
 • गुंडाळी करताना पण थोडे थोडे मिश्रण लावावे.
 • हि गुंडाळी प्रेशर कुकर मध्ये शिट्टी ना लावता १०-१२ मिनिटे वाफवावी.
 • त्यांनंतर बाहेर काढून, पातळ काप करून तव्या मध्ये थोडेसे तेल टाकून खरपूस शॅलो फ्राय करावी.
 • मग वड्यांवर भाजलेले तीळ व कोथिंबीर टाकून गरम गरम चहासोबत खायला द्यावे.