अळूची पातळ भाजी (Aluchi bhaji)

 • Post by Priyanka
 • Dec 10, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

अळूची पातळ भाजी

साहित्य:
 • अळूची ४-५ पाने,
 • ४-५ लसूण पाकळ्या,
 • १ टेबलस्पून भिजवलेली हरभरा डाळ,
 • पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप,
 • १ टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे,
 • एका बारीक लिंबाएवढी चिंच व त्याहून किंचित जास्त गूळ,
 • अर्धा टीस्पून तिखट,
 • २ टेबलस्पून बेसन,
 • चवीनुसार मीठ,
 • फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.
कृती:
 • अळूची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणे.
 • अळूची पाने चिरताना देठांची साले काढून मग चिरणे.
 • फोडणी करून त्यात लसूण व सुक्या खोबऱ्याचे काप टाकावे व २ मिनिटे परतावे.
 • मग चिरलेली अळूची पाने, हरभरा डाळ, व शेंगदाणे टाकावे.
 • मग त्यात पाव वाटी पाणी घालून झाकण ठेवून भाजी ५-७ मिनिटे शिजवावी.
 • नंतर त्यात चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, तिखट व बेसन घालून व्यवस्थित हलवावे.
 • मग त्यात १ ते दीड ग्लास पाणी घालून ७-८ वाफा काढाव्यात.