आवळ्याचे लोणचे (Awalyache Lonche - Pickle)

 • Post by Priyanka
 • Dec 12, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

आवळ्याचे लोणचे

साहित्य:
 • पाव किलो आवळे (साधारणपणे ९-१० येतात),
 • ४ टेबलस्पून मीठ,
 • ३ टीस्पून मोहरी,
 • २ टीस्पून तळलेले मेथीदाणे,
 • २ टीस्पून तिखट,
 • फोडणीसाठी ४ चमचे तेल,
 • १ टीस्पून हिंग,
 • १ टीस्पून हळद.
कृती:
 • आवळे स्वच्छ धुवून पुसून एका भांड्यात घालून कूकर मध्ये उकडून घ्यावे.
 • साधारणपणे ३-४ शिट्ट्या काढणे.
 • आवळे उकडताना भांड्यात पाणी घालू नये, फक्त कूकरच्या तळाशी पाणी घालणे.
 • कूकर मुरल्यावर आवळे बाहेर काढून एका ताटात घेऊन, त्यातल्या बियाकाढून टाकून, वाफ निघून जाण्याकरिता पसरून ताटात एखादा तास ठेवावे.
 • मिक्सर मध्ये २ चमचे मीठ, तळलेली मेथी व अडीच चमचे मोहरी बारीक करून घेणे.
 • एका छोट्या कढईत ४ चमचे तेल घेऊन त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, व अर्धा चमचा हळद टाकून फोडणी करावी व फोडणी गार करून घ्यावी.
 • मग वाफवलेल्या आवळ्याच्या फोडींमध्ये २ चमचे मीठ, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, व मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घालून नीट हलवून घ्यावे.
 • हे सर्व कोरड्या बरणीमध्ये दाबून भरून, वरून गार झालेली फोडणी घालून दादरा बांधून बरणी ठेवून द्यावी.

टीप: लोणचे नीट राहण्यासाठी सुरुवातीला, दर १-२ दिवसांनी हलवून नीट दाबून ठेवावे.