बीटरूट पराठा (Beetroot Paratha)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

बीटरूट पराठा

साहित्य:
  • २ मध्यम आकाराची बीट
  • ३ वाट्या कणिक
  • पाव वाटी मूगडाळ
  • पाव वाटी हरभरा डाळ
  • ५-६ लसूणपाकळ्या
  • १ टीस्पून ओवा
  • अर्धा टीस्पून तिखट
  • मीठ चवीनुसार
  • तेल
कृती:
  • साधारणपणे एक तास आधी हरभरा डाळ व मूग डाळ कोमट पाण्यात भिजत घालावी.
  • बीट कच्चे किसून घ्यावे.
  • भिजलेली मूगडाळ, हरभरा डाळ, लसूण, ओवा मिक्सरमधून बारीक फिरवून, परातीमध्ये काढून घ्यावे. ह्यामध्ये बारीक करताना पाणी घालू नये.
  • मग ह्यामध्ये किसलेले बीट, चवीनुसार मीठ, तिखट, १ चमचा तेल व ३ वाट्या कणिक घालावी.
  • वरील सर्व पदार्थ एकत्र करून, पोळीसाठी मळतो तसे पीठ मळून घ्यावे.
  • ह्याचे त्रिकोणी पराठे लाटून, दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावे.
  • हे पराठे अतिशय रुचकर लागतात.
comments powered by Disqus
TAG