भगर व दाण्याची आमटी (Bhagar and Groundnut amti)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jan 07, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

भगर व दाण्याची आमटी

साहित्य: (२ जणांसाठी)

भगर:

 • १ वाटी भगर (वरईचे तांदूळ)
 • २ मध्यम आकाराचे बटाटे किसून
 • २ चमचे साजूक तूप
 • पाव टीस्पून मीठ (चवीनुसार)

दाण्याची आमटी:

 • पाव वाटी भाजलेले शेंगदाणे (सालासकट)
 • १ चमचा साजूक तूप
 • अर्धा टीस्पून जिरेपूड
 • १ छोटी मिरची
 • इंचभर आल्याचा तुकडा
 • ३-४ आमसुले
 • पाव टीस्पून मीठ
 • १ टीस्पून किसलेला गूळ
कृती:

भगर :

 • भगर निवडून, बारीक चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवून निथळत ठेवावी.
 • एका कढईमध्ये तूप घेऊन ते गरम झाले कि त्यामध्ये किसलेला बटाटा व भगर टाकून २-३ मिनिटे परतून घ्यावे.
 • मग त्यामध्ये अडीच ग्लास पाणी व मीठ टाकावे.
 • भगर झाकण ठेवून मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवावी. भगर शिजताना मधून मधून हलवत राहावे.

दाण्याची आमटी:

 • आले, मिरची, मीठ व शेंगदाणे मिक्सर मधून बारीक फिरवून त्याची पेस्ट करून घ्यावी.
 • एका पातेल्यात तूप टाकून ,ते गरम झाले कि जिरेपूड व वरील पेस्ट टाकून १ मिनिट परतून घ्यावे.
 • मग त्यामध्ये २ ग्लास पाणी टाकावे.
 • नंतर त्यामध्ये आमसूल व गूळ टाकून, झाकण ठेवून ७-८ मिनिटे आमटी चंगली शिजवावी.