भेंडी बटाटा फ्राय (Bhendi Potato Fry)

 • Post by Priyanka
 • Dec 11, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

भेंडी बटाटा फ्राय (२ जणांसाठी)

साहित्य:
 • अर्धा पाव भेंडी,
 • २ मध्यम आकाराचे बटाटे,
 • १ टीस्पून तिखट,
 • २ चमचे तेल,
 • १ टीस्पून चाट मसाला,
 • ४-५ लसणाच्या पाकळ्या,
 • चवीनुसार मीठ,
 • फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, हळद .
कृती:
 • भेंडी स्वच्छ धुवून व कोरडी पुसून, उभे पातळ काप करून घ्यावेत.
 • बटाट्याचे सुद्धा उभे पातळ काप करून घ्यावेत.
 • एका पसरट कढईमध्ये तेल टाकून फोडणी करून घ्यावी.
 • मग त्यात लसणाचे तुकडे टाकून किंचित तळून घ्यावेत.
 • मग चिरलेला बटाटा टाकून ५-७ मिनिटे छान फ्राय करून घ्यावा.
 • झाकण ठेवू नये.
 • नंतर त्यामध्ये तिखट, मीठ, चाट मसाला टाकून छान हलवून घ्यावे.
 • नंतर चिरलेली भेंडी टाकून भाजी मस्त कुरकुरीत होईपर्यंत झाकण न ठेवता परतावी.

टीप: भाजी जास्त सारखी सारखी हलवू नये. व भाजी हलवल्यानंतर नीट पसरून ठेवावी, म्हणजे छान कुरकुरीत होते. तसेच भाजी लो फ्लेम वर करावी म्हणजे अधिक चविष्ट लागते.