कुकर केक प्रकार १ (Cooker Cake - Type 1)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jun 01, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

केक - प्रकार 1

साहित्य:
 • सव्वा वाटी मैदा
 • अर्धी वाटी साखर
 • अर्धी वाटी साजूक तूप
 • पाऊण वाटी दूध
 • १ टीस्पून बेकिंग पावडर
 • पाव टीस्पून बेकिंग सोडा
 • १० ग्रॅम कॅडबरी हॉट चॉकलेट पावडर
कृती:
 • कुकर रिंग व शिट्टी काढून बारीक गॅस वर गरम करत ठेवावा. तसेच कुकर मध्ये खाली एक भांडे पालथे ठेवावे.
 • साखर मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या.
 • तूप गरम करून, थोडे कोमट झाले कि त्यामध्ये बारीक केलेली साखर घालून छान फेटून घ्यावे.
 • मिश्रण छान एकजीव होऊन थोडे घट्ट होऊ लागले कि पाव वाटी दूध घालून पुन्हा चांगले फेटून घ्यावे.
 • मग त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर बेकिंग सोडा चमच्याने एकत्र करून, बारीक चाळणीने चाळून घालावा.
 • हे सर्व एकजीव होईपर्यंत नीट हलवावे.
 • मग त्यामध्ये पाव वाटी दूध घालून परत मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवावे.
 • खूप जोरात आणि जास्त फेटू नये, असे केल्यास केक हलका होत नाही.
 • मग ह्या मिश्रणाचे दोन भाग करून एका भागामध्ये हॉट चॉकलेट पावडर व २-३ चमचे दूध टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
 • केक च्या भांड्याला तुपाचा हात लावून, त्यावर मैदा भुरभुरावा.
 • मग त्यामध्ये केकचे दोन्ही प्रकारचे मिश्रण एक-एक चमचा टाकत, भांड्यावर टिचकी मारत मारत पॅटर्न तयार करावा.
 • मग भांडे कुकर मध्ये ठेवून, बारीक फ्लेमवर केक ४०-४५ मिनिटे बेक करावा.