कॉर्न पालक सँडविच (Cheesy Corn Spinach Sandwich)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

कॉर्न पालक सँडविच

साहित्य:
 • १ वाटी स्वीटकॉर्नचे वाफवलेले दाणे
 • २ वाट्या बारीक चिरलेला पालक
 • १०० ग्रॅम पनीर (ऐच्छिक)
 • १ वाटी किसलेले चीझ
 • अर्धा टीस्पून मिरपूड
 • पाव टीस्पून तिखट
 • १ टेबलस्पून कणिक
 • सव्वा कप दूध
 • १ टीस्पून तूप
 • मीठ चवीनुसार
 • ब्रेड
 • भाजण्यासाठी ऑलिव्ह ऑइल
कृती:
 • कढईमध्ये तूप घेऊन ते गरम झाले कि त्यामध्ये गव्हाचे पीठ घालावे. आणि ते मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजावे.
 • मग गॅस बंद करून त्यामध्ये पाव कप कोमट दूध घालून नीट मिक्स करून घ्यावे. गाठी होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
 • मग गॅस लो फ्लेमवर चालू करून, उरलेले १ कप दूध हळू हळू घालत मिश्रण सतत ढवळत राहावे.
 • साधारण ५ मिनिटांमध्ये व्हाईट सॉस चांगला घट्ट होईल.
 • मग त्यामध्ये कॉर्न, पालक, पनीर, मीठ, तिखट, मिरपूड घालून चांगले हलवून घ्यावे.
 • नंतर झाकण ठेवून ४-५ वाफा काढाव्यात आणि मग गॅस बंद करून किसलेले चीझ घालून नीट हलवून घ्यावे.
 • ब्रेडवरती हे मिश्रण पसरवून वर दुसरी स्लाइस ठेवून, तूप सोडून सँडविच सोनेरी रंगावर भाजावे.
 • हे सँडविच अतिशय रुचकर व पौष्टिक आहे.
comments powered by Disqus
TAG