चिली मशरूम (Mushroom Chilli)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Feb 10, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

चिली मशरूम

साहित्य:
 • १०-१२ कोवळी बटन मशरूम्स
 • १ मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून
 • १ छोटी सिमला मिरची चौकोनी चिरून
 • १ टेबलस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात
 • अर्धा टीस्पून बारीक चिरलेला लसूण
 • अर्धा टीस्पून बारीक चिरलेले आले
 • १ छोटी हिरवी मिरची बारीक चिरून
 • १ टेबलस्पून सोया सॉस
 • २ टेबलस्पून टोमॅटो केचप
 • १ टीस्पून मीठ
 • अडीच चमचे मैदा
 • अर्धा टीस्पून तिखट
 • पाव टीस्पून जिरेपूड
 • पाव टीस्पून हळद
 • २ चमचे तेल
कृती:
 • मशरूम्स स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवावे.
 • एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ, हळद व जिरेपूड घालून नीट मिक्स करून घ्यावे.
 • त्यामध्ये पाव वाटी पाणी घालून नीट मिक्स करून घ्यावे. गाठी राहता कामा नये.
 • मग त्यामध्ये मशरूम्स टाकून नीट मिक्स करून अर्धा तास मॅरीनेट होण्यासाठी ठेवावे.
 • अर्ध्या तासानंतर एका कढईमध्ये १ चमचा तेल घ्यावे.
 • तेल गरम झाले कि त्यामध्ये मशरूम्स सोडून सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करावेत.
 • मशरूम्स बाजूला काढून घेऊन, कढईमध्ये अजून एक चमचा तेल टाकावे.
 • मग त्यामध्ये लसूण व आले टाकून २-३ मिनिटे फ्राय करावे.
 • मग त्यामध्ये कांदा, सिमला मिरची, कांद्याची पात व मिरचीचे तुकडे टाकून २-३ मिनिटे हाय फ्लेम वर फ्राय करावे.
 • नंतर त्यामध्ये मॅरीनेट करायला वापरलेले मिश्रण टाकावे. व एकसारखे हलवत राहावे.
 • नंतर मैदा शिजून मिश्रणाला थोडा घट्टपणा येईल. लागल्यास अजून पाव वाटी पाणी घालावे.
 • मग त्यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ घालून नीट हलवून घ्यावे.
 • त्याला थोडीशी उकळी आली कि मग त्यामध्ये फ्राय केलेले मशरूम्स घालून, २-३ मिनिटे झाकण न ठेवता शिजवावे. व गरम गरम सर्व करावे.