मोमो साठी चटणी (Chutni for Momo)

 • Post by Priyanka
 • Dec 20, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

मोमो साठी चटणी

साहित्य:
 • ३-४ लाल सुक्या मिरच्या (शक्यतो कमी तिखट),
 • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो,
 • १ चमचा तेल,
 • पाव चमचा बारीक चिरलेला लसूण,
 • पाव चमचा बारीक चिरलेले आले,
 • १ चमचा साखर,
 • चवीनुसार मीठ.
कृती:
 • एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात मिरच्या उकळाव्या.
 • मग त्यात टोमॅटोच्या मोठ्या फोडी टाकून,
 • ५-७ मिनिटे झाकण ठेवून उकळावे.
 • टोमॅटोची साले सुटली पाहिजेत.
 • हे गार झाले कि मग मिक्सर मधून फिरवून स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
 • मग एका छोट्या कढईत तेल घेऊन तेल तापले कि त्यात बारीक चिरलेले आले व लसूण घालून २-३ मिनिटे परतावे.
 • मग त्यात टोमॅटो व मिरचीची पेस्ट घालून मीठ व साखर घालावी.
 • हे मिश्रण सतत ढवळत राहून ५-७ मिनिटे शिजवावे.
मोमोज: व्हेज मोमोज