कॉर्न पालक पनीर रोल (Corn Spinach Paneer Roll)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • May 30, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

कॉर्न पालक पनीर रोल

साहित्य:
 • १ वाटी मऊ शिजवलेले स्वीटकॉर्नचे दाणे
 • १ वाटी बारीक चिरलेला पालक
 • २ मोठे उकडलेले बटाटे
 • अर्धी वाटी कुस्करलेले पनीर
 • १ गाजर उभे पातळ चिरून
 • २ मध्यम कांदे उभे पातळ चिरून
 • १ टीस्पून तिखट
 • २ टीस्पून मीठ
 • पाव टीस्पून मिरपूड
 • पाव टीस्पून चाट मसाला
 • २ वाट्या कणिक
 • मेयोनिज
 • २ चमचे तेल
कृती:
 • कणिक घेऊन त्यामध्ये मीठ व अर्धा चमचा तेल टाकून, पोळीसाठी मळतो त्याप्रमाणे कणिक मळून भिजण्यासाठी झाकून ठेवावी.
 • बटाटे व स्वीटकॉर्न कूकरला लावून मऊ उकडून घ्यावेत.
 • एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्यात कांदा व गाजर टाकून ३-४ मिनिटे हाय फ्लेम वर परतून घ्यावे व एका ताटलीमध्ये काढून ठेवावे.
 • मग त्याच कढईमधे एक चमचा तेल टाकून, त्यामध्ये पालक २-३ मिनिटे परतून घ्यावा.
 • मग त्यामध्ये पनीर व स्वीटकॉर्न चे दाणे टाकून ४-५ मिनिटे छान परतून घ्यावे.
 • नंतर त्यामध्ये मीठ, तिखट, चाट मसाला व मिरपूड टाकून नीट हलवून घ्यावे.
 • मग बटाटे कुस्करून टाकावेत. आणि हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत ७-८ मिनिटे परतावे. झाकण ठेवू नये. हे रोल मध्ये भारण्यासाठीचे सारण तयार झाले.
 • ह्यानंतर घडी न घालता पोळ्या करून घ्याव्या.
 • मग एकेक पोळी घेऊन त्यावर, कांदा, गाजर टाकावे. मग रोल साठी बनवलेले सारण टाकून त्यावर मेयॉनीज टाकून घट्ट रोल करावा.
 • रोल चिकटवण्यासाठी सुद्धा आपण मेयॉनीज वापरू शकतो.