दडपे पोहे (Dadpe Pohe)

 • Post by Priyanka
 • Dec 17, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

दडपे पोहे (४ माणसांसाठी)

साहित्य:
 • २ वाट्या जाड पोहे,
 • २ चमचे दही,
 • १ मध्यम आकाराचा कांडा बारीक चिरून,
 • २ चमचे गोड मसाला,
 • मीठ,
 • १ चमचा पिठी साखर,
 • अर्धी वाटी ओले खोबरे,
 • २ हिरव्या मिरच्या,
 • फोडणीसाठी- तेल, हिंग, हळद, मोहरी, कडीपट्ट्याची ८-१० पाने,
 • कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती:
 • जाड पोहे चाळून, निवडून स्वच्छता करावेत.
 • त्यानंतर पाण्याने धुवून पूर्ण निथळून ठेवावेत.
 • १५ मिनिटाने त्यात गोड मसाला, मीठ, पिठीसाठार, खोबऱ्याचा चव, कांदा व दही घालून नीट एकत्र करून झाकून ठेवावेत.
 • कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता व मिरच्या घालून खमंग फोडणी करून घ्यावी.
 • ही फोडणी पोह्यांवर घालून हलके कालवावे व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.