दावणगिरी डोसा (Davangiri Dosa)

 • Post by Priyanka
 • Dec 18, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

दावणगिरी डोसा (साधारणपणे १८ मध्यम आकाराच्या डोश्यांसाठी)

साहित्य:
 • २ वाट्या तांदूळ,
 • अर्धी वाटी जाड पोहे,
 • पाव वाटी उडीद डाळ,
 • पाव वाटी साबुदाणा,
 • १५-२० मेथीदाणे,
 • १ छोटा चमचा खाण्याचा सोडा,
 • १२५ ग्रॅ.
 • ताजे लोणी,
 • चवीनुसार मीठ.
कृती:
 • तांदूळ, पोहे, साबुदाणा, उडीद डाळ, मेथीदाणे सर्व एकत्र करून स्वच्छ निवडून व धुवून घेणे.
 • मग एका पातेल्यात हे सर्व बुडून वर एक पेर राहील असे पाणी टाकून किमान ७-८ तास भिजवणे.
 • नंतर मिक्सर मधून एकदम बारीक वाटून घेणे.
 • मिश्रण रवाळ राहता कामा नये.
 • मग त्यात मीठ व खाण्याचा सोडा घालून रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवणे.
 • सकाळी चवीनुसार अजून मीठ वाढवून डोसे घालणे.
 • मिश्रण व्यवस्थित पातळ असावे व डोसा घालताना ते आपोआप पसरले जावे.
 • डोसा पळीने पसरवल्यास त्याचे टेक्स्चर बिघडते.
 • डोसा एका बाजूने वाळत आला कि मग त्याला व्यवस्थित लोणी लावून डोसा पलटणे व दुसऱ्या बाजूने पण झाकण ठेवून खरपूस भाजून घेणे.