दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhopla bhaji)

 • Post by Priyanka
 • Dec 17, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

दुधी भोपळ्याची भाजी

साहित्य:
 • पाव किलो दुधी भोपळा,
 • अर्धी वाटी भिजवलेली मूगडाळ,
 • ४-५ लसूणपाकळ्या,
 • ७-८ कढीपत्त्याची पाने,
 • १ तिखट मिरची,
 • चवीनुसार मीठ,
 • बारीक चिरलेली कोथिंबीर,
 • फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग.
कृती:
 • दुधी भोपळ्याची साल काढून चौकोनी फोडी करून घ्याव्यात.
 • कढईमधे तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्यावी.
 • मग त्यात लसणाचे तुकडे घालून गुलाबी होईपर्यंत परतावे.
 • मग त्यात मिरचीचे तुकडे कढीपत्ता व दुधीभोपळ्याच्या फोडी टाकून नीट हलवावे.
 • नंतर त्यात मूगडाळ, मीठ व पाव वाटी पाणी घालून झाकण ठेवून भाजी १५ मिनिटे शिजवणे.
 • नंतर गॅस बंद करून चरलेली कोथिंबीर टाकावी.

टीप: शिजवताना भाजी मधून मधून हलवावी. तसेच दुधीभोपळ्याच्या फोडी शिजून फारच मऊ होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.