झटपट सोपे व्हेज चीज सँडविच (Easy Veg Cheese Sandwich)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • May 17, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

झटपट सोपे व्हेज चीज सँडविच

साहित्य:
 • २ उकडलेले बटाटे
 • १ काकडी
 • २ टोमॅटो
 • २ कांदे
 • अर्धा टीस्पून मीठ
 • अर्धा टीस्पून चाट मसाला
 • पाव टीस्पून तिखट
 • पाव टीस्पून मिरपूड
 • चीज स्लाइसेस
 • बटर
 • व्हीट ब्रेड
कृती:
 • काकडी, गाजर, टोमॅटो, उकडलेले बटाटे ह्यांचे पातळ काप करून घ्यावेत.
 • तिखट, मीठ, चाट मसाला व मिरपूड एकत्र करून सँडविचसाठी मसाला तयार करावा.
 • मग ब्रेड च्या दोन स्लाईसेस घेऊन त्याला एका बाजून बटर लावून घ्यावे.
 • मग एका स्लाइसवर काकडीचे दोन व टोमॅटोचे दोन काप ह्याप्रमाणे पहिला लेअर बनवावा.
 • त्यावर थोडासा मसाला भुरभुरावा.
 • मग त्यावर कांद्याचे २ काप व बटाट्याचे दोन काप असा दुसरा लेअर बनवून मसाला भुरभुरावा.
 • त्यावर चीज स्लाइस ठेवून दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवावी.
 • एक पॅन गरम करून, त्यामध्ये बटर सोडून सँडविच दोन्ही बाजूने खरपूस भाजावे.
 • सँडविच भाजताना झाकण ठेवावे.