अंडा बिर्याणी (Egg Biryani)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Mar 10, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

अंडा बिर्याणी (२ जणांसाठी)

साहित्य:
 • ४ उकडून सोललेली अंडी
 • पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
 • पाव वाटी चिरलेला पुदिना
 • १ कांदा उभा चिरून, गुलाबी तळून
 • १ वाटी आख्खा बासमती तांदूळ
 • ३ लवंगा, ४-५ मिरे, ३-४ वेलदोडे, अर्धा टीस्पून जिरे, ३-४ दालचिनीचे मध्यम आकाराचे तुकडे, १ टीस्पून मीठ, १ चमचा साजूक तूप
 • १ टीस्पून बिर्याणी मसाला
 • अर्धी वाटी दही
 • अर्धा टीस्पून तिखट
 • पाव टीस्पून हळद
 • अर्धा टीस्पून आले लसूण पेस्ट
 • १ मोठा कांदा बारीक चिरून
 • १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
 • ३ चमचे तेल
कृती:
 • प्रथम बासमती तांदूळ धुवून, साधारणपणे अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावा.
 • मग त्यामध्ये जिरे, मिरे, वेलदोडा, दालचिनी, मीठ, लवंगा, व तूप टाकावे.
 • तांदूळ भिजतील इतकेच पाणी टाकून, ३-४ शिट्ट्या करून अर्धा कच्चा भात शिजवून घ्यावा.
 • भात शिजल्यावर गार होण्यासाठी ताटामध्ये उपसून ठेवावा.
 • एका कढईमध्ये २ चमचे तेल गरम करावे.
 • मग त्यात थोडे तिखट व हळद टाकून, उकडलेली अंडी सोनेरी रंगावर परतून घ्यावी.
 • मग त्याच कढईमधे अजून एक चमचा तेल टाकून, त्यात आले लसूण पेस्ट व कांदा टाकावा.
 • कांदा गुलाबी परतून घ्यावा.
 • मग त्यामध्ये टोमॅटो, चवीनुसार मीठ, तिखट, हळद टाकून झाकण ठेवून ५ मिनिटे परतावे.
 • टोमॅटोला पाणी सुटले कि बिर्याणी मसाला टाकून नीट छान वास येईपर्यंत १-२ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये दही टाकून एकसारखे हलवत रहावे.
 • मग त्यामध्ये उकडलेली व परतलेली अंडी टाकावी.
 • त्याच्यावर तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर टाकावी.
 • मग त्यावर शिजवलेला भात टाकून परत तळलेला कांदा, कोथिंबीर, व पुदिना टाकावा.
 • मग झाकण ठेवून १० मिनिटे वाफ आणावी. वाफ आणताना मधून मधून बिर्याणी हलवू नये.