अंडा करी (Egg Curry)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

अंडा करी (२ जणांसाठी)

साहित्य:
 • ४ उकडून सोललेली अंडी
 • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
 • २ मध्यम आकाराचे कांदे
 • २ टीस्पून आले लसूण पेस्ट
 • अर्धा टीस्पून तिखट (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
 • १ टीस्पून धनेपूड
 • अर्धा टीस्पून जिरेपूड
 • १ टीस्पून गरम मसाला
 • अर्धा टीस्पून हळद
 • अर्धा टीस्पून मीठ (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
 • ३ चमचे तेल
 • कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
 • एका उथळ कढईमध्ये १ चमचा तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळद व चिमूटभर तिखट टाकावे.
 • उकडलेली अंडी सोलून त्यांना काट्याने ठिकठिकाणी छिद्रे पडून घ्यावीत.
 • मग त्यामध्ये सोललेली अंडी टाकून चांगली तांबूस होईपर्यंत सर्व बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्यावीत.
 • मग त्याच कढईमध्ये अजून २ चमचे टाकून ते तापले कि बारीक चिरलेला कांदा टाकावा.
 • कांदा गुलाबी होऊन मऊ झाला कि त्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकून २-३ मिनिटे परतून घ्यावे.
 • मग त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून, झाकण ठेवून टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत शिजवावे.
 • मग त्यामध्ये तिखट, मीठ, गरम मसाला, धने-जिरे पूड, हळद टाकून नीट मिक्स करून अजून ३-४ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये परतलेली अंडी टाकून २-३ मिनिटे परतावे.
 • नंतर दीड ग्लास पाणी टाकून मंद आचेवर भाजी झाकण ठेवून १५-२० मिनिटे शिजवावी.
 • भाजी शिजवताना मधून मधून हलवत राहावे.
 • मग गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सजवावी.
 • हि अंडा करी खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खूप चविष्टही लागते.