फ्लॉवरची भाजी - प्रकार १ (Cauliflower Curry - Type 1)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Feb 03, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

फ्लॉवरची भाजी - प्रकार १

साहित्य:
 • पाव किलो कॉलीफ्लॉवरचे तुरे
 • पाव वाटी मटारदाणे
 • पाव टीस्पून आले-लसूण पेस्ट
 • १ मध्यम कांदा बारीक चिरून
 • चवीनुसार मीठ
 • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • फोडणीसाठी: २ चमचे तेल, पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हळद, कडीपत्ता
 • मसाला : १ सुकी लाल मिरची, ३ लवंगा, ३-४ मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे, पाव टीस्पून बडीशोप, पाव टीस्पून जिरे, पाव टीस्पून मिरे
कृती:
 • फ्लॉवरचे तुरे स्वच्छ धुवून घेऊन, १ टीस्पून मीठ टाकून पाण्यामध्ये २-३ मिनिटे उकळून घ्यावे
 • एका कढईमधे जिरे, बडीशोप, सुकी मिरची, दालचिनी, लवंग, मिरे घेऊन, ५ मिनिटे सुके भाजून घ्यावे. व त्याची मिक्सर मधून पूड करून घ्यावी.
 • मग कढईमधे तेल घेऊन त्यात मोहरी टाकावी.
 • मोहरी छान तडतडली कि मग आले लसूण पेस्ट, कडीपत्ता व कांदा टाकून, कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे.
 • मग त्यामध्ये हळद, फ्लॉवरचे तुरे, मटार टाकून नीट हलवून घ्यावे.
 • मग त्यात पाव वाटी पाणी घालून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
 • नंतर त्यात वर तयार केलेला मसाला घालून नीट हलवून, परत ५ मिनिटे झाकण ठेवून शिजवावे.
 • मग गॅस बंद करून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाजी फुलका व चपाती बरोबर खायला घ्यावी.