गाजर हलवा (Gajar Halwa)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

गाजर हलवा

साहित्य:
 • गाजराचा किस - ३ वाट्या
 • साखर - पाऊण वाटी
 • साजूक तूप - ४ चमचे
 • घट्ट साय - अर्धी वाटी
 • बदाम - ६-७
 • विलायची - ३
कृती:
 • कढईमध्ये तूप टाकून ते गरम झाले कि त्यामध्ये गाजराचा किस टाकावा.
 • झाकण ठेवून गाजराचा किस ५-६ मिनिटे शिजवावा.
 • मग त्यामध्ये साखर नीट मिसळून घेऊन, परत १०-१२ मिनिटे झाकण ठेवून हलवा शिजवावा.
 • हलवा शिजवताना मधून मधून हलवत राहावे.
 • नंतर त्यामध्ये घट्ट साय टाकून, सर्व नीट एकत्र करून परत ५ मिनिटे शिजवावे.
 • हलवा नीट एकजीव झाला कि गॅस बंद करून, वरून विलायची पूड व बदामाचे काप घालून सर्व्ह करावा.

टीप : गाजरे गोड असल्यास जरा कमी साखर वापरावी.