गुळाची पोळी (Gulachi Poli)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

गुळाची पोळी

साहित्य:
 • २ वाट्या बारीक चिरलेला गूळ
 • दीड वाटी तीळ
 • ५-६ वेलदोडे
 • १ टेबलस्पून बेसन
 • १ टीस्पून खसखस
 • बेसन भिजेल इतके तूप
 • ४ वाट्या कणिक
 • १ चमचा तेल
 • पाव टीस्पून मीठ
 • १ टेबलस्पून तांदळाची पिठी
कृती:
 • तीळ गुलाबीसर भाजून त्याचे बारीक कूट करून घ्यावे.
 • मग त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून, मिक्सरमधून फिरवून एकजीव करून घ्यावे.
 • एका कढईमध्ये बेसन भिजेल इतके तूप घालून, त्यामध्ये बेसन घालून मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावे.
 • मग भाजलेले बेसन, तीळ व गुळाच्या मिश्रणात घालावे.
 • वरून वेलदोड्याची पूड घालावी.
 • तसेच खसखस भाजून घालावी.
 • मग हाताने हे मिश्रण चांगले मळून घ्यावे.
 • परातीमध्ये कणिक घेऊन, त्यामध्ये तांदळाची पिठी व मीठ टाकावे.
 • मग एक चमचा तेल गरम करून घालावे.
 • आणि सर्व एकत्र करून, घट्ट कणिक मळून अर्धा तास झाकून ठेवावी.
 • अर्ध्या तासाने, तांदळाची पिठी लावून हलक्या हाताने पोळ्या लाटाव्यात.
 • पोळ्या करताना आलू पराठा करतो तसे गुळाचे सारण आत भरून पोळी करावी.
 • नॉनस्टिक किंवा बिडाच्या तव्यावर दोन्ही बाजूंनी पोळी खरपूस भाजावी.
 • व गार झाल्यावर भरपूर तुपाबरोबर खावी.
 • ह्या साहित्यामध्ये साधारणपणे ९-१० पोळ्या होतील.