हापूस आंब्याचा भात (Mango Rice)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Dec 19, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

हापूस आंब्याचा भात

साहित्य:
 • १ वाटी बासमती तांदूळ,
 • १ वाटी साखर (तांदुळापेक्षा किंचित कमी),
 • १ हापूस आंबा,
 • वेलची पूड,
 • बदामाचे तुकडे,
 • १ चमचा साजूक तूप,
 • ४ लवंगा,
 • पाव टीस्पून मीठ.
कृती:
 • १ वाटी तांदळाला २ वाट्या पाणी व पाव टीस्पून मीठ घालून भात शिजवून घ्यावा.
 • भात गार व मोकळा करून घ्यावा.
 • तुपावर लवंगा परतून घेऊन साखर घालावी व एकसारखे हलवत राहावे.
 • साखरेला थोडे पाणी सुटू लागले कि मग त्यात आंब्याचा रस घालावा व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे.
 • मग त्यामध्ये शिजवलेला भात घालून ८-१० वाफा काढाव्यात.
 • भात नीट कोरडा झाला कि मग गॅस बंद करून बदामाचे पातळ काप व वेलची पूड टाकावी.
नारळीभात: नारळीभात
तवा पुलाव: तवा पुलाव