जवसाची चटणी (Jawas Chutni)

  • Post by Priyanka
  • Dec 16, 2019
  • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

जवसाची चटणी

साहित्य:
  • जवस १०० ग्रॅ
  • ५-६ सुक्या लाल मिरच्या (गुंटूर मिरच्या),
  • २ चमचे जिरे,
  • मीठ
कृती:
  • जवस व लाल मिरच्या कढईमधे घालून एकदम हलका धूर येईपर्यंत भाजून घ्यावे.
  • भाजताना सतत चमच्याने हलवत राहावे म्हणजे जवस करपणार नाहीत.
  • मग जवस गार झाल्यावर, प्रथम मिक्सर मध्ये मीठ, जिरे, भाजलेल्या मिरच्या बारीक करून घ्यावेत व
  • त्यामध्ये नंतर जवस घालून बारीक करावे. खमंग जवसाची चटणी तयार.