कांद्याच्या पातीची भाजी (Spring Onion bhaji)

 • Post by Priyanka
 • Dec 15, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

कांद्याच्या पातीची भाजी

साहित्य:
 • एक मध्यम आकाराची कांद्याची पात,
 • २ मध्यम आकाराचे टोमॅटो,
 • १ मोठा बटाटा,
 • छोटा अर्धा चमचा गरम मसाला,
 • १ चमचा धने पूड,
 • १ चमचा जिरे पूड,
 • १ चमचा तिखट,
 • मीठ चवीनुसार,
 • फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, २ चमचे तेल.
कृती:
 • कांद्याची पात स्वच्छ करून त्यातले कांदे व पात वेगवेगळे चिरून घेणे.
 • तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करणे.
 • मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून, टोमॅटो मऊ होईपर्यंत परतणे.
 • त्यानंतर त्यात पातीचा कांदा टाकून २-३ मिनिटे परतणे.
 • मग त्यात तिखट, धने-जिरे पूड, गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकणे.
 • नीट हलवून मग त्यात चिरलेला बटाटा टाकून पाव वाटी पाणी टाकणे व झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवणे.
 • नंतर त्यात चिरलेली कांद्याची पात टाकून भाजी कोरडी होईपर्यंत झाकण ठेवून शिजवणे.