कणकेचा केक (Wheat Cake)

 • Post by Priyanka
 • Dec 13, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

कणकेचा केक

साहित्य:
 • दीड वाटी कणिक,
 • अर्धी वाटी मैदा,
 • १ किंवा सव्वा वाटी पिठी साखर (गोडाच्या चवीनुसार),
 • १ वाटी साय,
 • व्हॅनिला एसेन्स,
 • १ टीस्पून बेकिंग पावडर,
 • अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
कृती:
 • प्रथम कणिक व मैदा चाळून घेणे व त्यात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा मिसळून घेणे.
 • मग हे एका पातेल्यात घेऊन त्यात पिठी साखर, साय, व व्हॅनिला एसेन्स टाकून सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत एका बाजूने फेटणे.
 • रिंग व शिट्टी काढून पाणी न टाकता कुकर गरम करायला लावणे.
 • केक च्या भांड्याला तुपाचा हात लावून वरून थोडा मैदा भुरभुरावा व भांडे उलटे करून त्यास टिचकी मारावी म्हणजे जास्तीचा मैदा राहणार नाही.
 • हे भांडे कुकर बरोबर गरम करायला ठेवावे.
 • भांडे गरम झाले कि त्यात छान फेटलेले केक चे मिश्रण ओतावे व कुकर मध्ये साधारण पणे पाऊण तास ठेवावे.