खजूर कणिक शिरा (Dates Sheera)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

खजूर कणिक शिरा

साहित्य:
 • पाव वाटी साजूक तूप,
 • दीड वाटी कणिक,
 • १ वाटी बारीक चिरलेला खजूर,
 • पाऊण वाटी खवा,
 • १ वाटी बारीक चिरलेला गूळ,
 • बदामाचे काप,
 • विलायची पूड.
कृती:
 • कढईमध्ये तूप घेऊन त्यात कणिक गुलाबी भाजून घ्यावी.
 • मग त्यात खावा टाकून ५ मिनिटे एकजीव होईपर्यंत परतावे.
 • त्यानंतर त्यामध्ये चिरलेला खजूर घालून अजून ५ मिनिटे परतून घ्यावे.
 • एका पातेल्यामध्ये सव्वा वाटी पाणी घेऊन ते उकळावे व त्यात चिरलेला गूळ विरघळवून घ्यावा.
 • मग हे गुळाचे पाणी कढईमधील मिश्रणात टाकून नीट हलवून घ्यावे व ५-६ वाफा काढाव्यात.
 • नंतर गॅस बंद करून बदामाचे काप व विलायची पूड टाकून नीट हलवून घ्यावे.

टीप: खजूर नीट साफ करून धुवून घेऊन मग चिरावा. हा शिरा अतिशय पौष्टिक असून ह्यातून भरपूर लोह मिळते.