मँगो फिरनी (Mango Firni)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jun 28, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

मँगो फिरनी

साहित्य:
 • २ मोठे गोड आंबे
 • अर्धा लिटर दूध
 • पाव वाटी तांदूळ
 • पाव वाटी साखर
 • २-३ वेलदोडे
 • ५-६ काजू
 • ५-६ बदाम
 • ५-६ पिस्ते
कृती:
 • तांदूळ स्वच्छ धुवून, एखादा तास भिजवून ठेवावेत.
 • दूध तापवून घ्यावे.
 • तांदूळ भिजले कि मिक्सर मधून २-३ चमचे पाणी टाकून भरडून घ्यावे.
 • मग उकळलेल्या दुधामध्ये तांदळाची पेस्ट टाकत, एकसारखे हलवत राहावे. तांदळाची पेस्ट टाकताना गॅस बंद ठेवावा.
 • मग गॅस चालू करून एकसारखे हलवत राहावे. तांदळाच्या पिठाच्या गाठी होऊ देऊ नयेत.
 • हे थोडे घट्ट झाले कि ह्यामध्ये, एका आंब्याचा गर मिक्सर मध्ये फिरवून घालावा.
 • आणि साखर घालून परत एकसारखे हलवत राहावे.
 • सर्व मिश्रण एकजीव होऊन थोडे घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
 • मग हे थंड झाले कि वरून एका आंब्याच्या बारीक फोडी, काजू-पिस्ता-बदामाचे पातळ काप व विलायची पूड टाकून खायला घ्यावे.