मसाला इडली (Masala Idli)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

मसाला इडली (२-३ जणांसाठी)

साहित्य:
 • १८-२० मध्यम आकाराच्या शिळ्या इडली,
 • ३ चमचे तेल,
 • चिमूटभर मिरपूड,
 • १ मध्यम मिरची बारीक चिरून,
 • ४-५ मोठ्या लसूण पाकळ्या बरीक चिरून,
 • इंचभर आल्याचा तुकडा बारीक चिरून,
 • १ टीस्पून सोया सॉस,
 • १ मध्यम कांदा चौकोनी तुकडे करून,
 • १ छोटे गाजर उभे चिरून,
 • १ छोटी सिमला मिरची उभी चिरून,
 • १ मध्यम टोमॅटो उभा चिरून,
 • १ टीस्पून मीठ.
कृती:
 • इडलीचे उभे काप करून दीड चमचा तेल टाकून तव्यावर सोनेरी होईपर्यंत शॉलो फ्राय करून घ्यावेत.
 • मग नॉनस्टिक कढई मध्ये दीड चमचा तेल टाकून, ते गरम झाले कि चिमूटभर मिरपूड टाकावी.
 • मग गॅस ची फ्लेम मोठी करून कांदा, लसूण, मिरची, आले टाकून दोन मिनिटे परतून घ्यावे.
 • नंतर त्यात टोमॅटो, मीठ टाकून २ मिनिटे परतावे.
 • नंतर त्यात गाजर, सिमला मिरची टाकून २ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये सोया सॉस टाकून चांगले मिक्स करावे व शॉलो फ्राय केलेल्या इडली टाकून ५-७ मिनिटे लो फ्लेम वर परतावे.

टीप: सर्व भाज्या हाय फ्लेम वर झाकण न ठेवता परताव्या, म्हणजे छान क्रंची लागतात.

कटलेट: स्वीट कॉर्न चीज कटलेट