मटर पनीर (Matar Paneer)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Dec 25, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

मटर पनीर

साहित्य:
 • ३ चमचे तेल,
 • १२५ ग्रॅ. पनीर,
 • १५० ग्रॅ. फ्रोझन मटार दाणे,
 • थोडीशी कोथिंबीर,
 • २ चमचे मलई

ग्रेव्ही:

 • २ मध्यम कांदे,
 • २ मोठे टोमॅटो,
 • ८-१० काजू,
 • बोटभर आल्याचा तुकडा,
 • दीड टेबलस्पून साखर,
 • अर्धा टेबलस्पून तिखट,
 • चवीनुसार मीठ

सुका मसाला:

 • १ चक्री फूल,
 • २ लवंगा,
 • ५ वेलदोडे,
 • २-३ दालचिनीचे मध्यम आकाराचे तुकडे,
 • दीड टेबलस्पून धने,
 • १ टेबलस्पून जिरे
कृती:
 • वरील सुक्या मसाल्याचे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यावे आणि एका ताटलीत काढून घ्यावे.
 • कांदा व टोमॅटो उभे चिरून घ्यावे. कढईमधे १ चमचा तेल घालून त्यामध्ये तेल तापल्यावर कांदा घालावा.
 • त्यामध्ये आल्याचा तुकडा, काजू घालून थोडेसे परतून घ्यावे.
 • त्यानंतर त्यात टोमॅटो, साखर, तिखट, चवीनुसार मीठ घालून झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवणे.
 • हे सर्व गार झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
 • कढई मध्ये २ चमचे तेल घालून तेल तापल्यावर वरील सुका मसाला ५ मिनिटे परतून घ्यावा.
 • मसाल्याचा खमंग वास सुटल्यावर त्यात कांदा टोमॅटोचे केलेले वाटण घालावे आणि तेल सुटेपर्यंत साधारण १५ मिनिटे परतावे.
 • मग त्यात १ ते दीड ग्लास पाणी घालून त्याला उकळी आली की पनीर चे क्युब्स टाकावे.
 • फ्रोझन मटार टाकावे. झाकण ठेवून भाजी १० मिनिटे नीट शिजवणे.
 • मग त्यात २ चमचे फ्रेश मलई टाकून नीट ढवळून ५ मिनिटे शिजवणे.
 • नंतर गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी पोळी किंवा पराठ्या बरोबर सर्व करावी.