मिरचीचा खर्डा (कमी तिखट)(Mirchicha Kharda)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

मिरचीचा खर्डा (कमी तिखट)

साहित्य:
 • ८-१० पोपटी कमी तिखट मिरच्या
 • ८-१० लसूणपाकळ्या
 • अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे (सालासकट)
 • १ टीस्पून जिरे
 • १ चमचा तेल
 • चवीनुसार मीठ
 • १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
 • मिरच्यांचे तुकडे, लसूणपाकळ्या आणि शेंगदाणे मिक्सरमधून भरड फिरवून घ्यावेत.
 • कढईमध्ये १ चमचा तेल घेऊन, ते गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाकावे.
 • जिरे तडतडले कि त्यामध्ये मिक्सरमधून फिरवलेले मिरची-शेंगदाणे-लसूण टाकावे.
 • चवीनुसार मीठ घालावे आणि परतत राहावे.
 • ५ मिनिटाने कोथिंबीर घालावी. आणि शेंगदाणे तांबूस होईपर्यंत खर्डा परतावा.
 • हा खर्डा कमी तिखट लागतो तरी पण भाकरीबरोबर खूप चविष्ट लागतो. तसेच ४-५ दिवस छान टिकतोही.