मुगाचा डोसा (Moong Dosa)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

मुगाचा डोसा

साहित्य:
 • दीड वाटी हिरवे मूग
 • ५-६ लसूणपाकळ्या
 • १ इंच आल्याचा तुकडा
 • १ हिरवी तिखट मिरची
 • मूठभर कोथिंबीर
 • १ टीस्पून जिरे
 • मीठ चवीनुसार
 • तेल
कृती:
 • मूग निवडून स्वच्छ धुवून ७-८ तास भिजत घालावे.
 • मूग चांगले भिजले आणि फुगले कि पाणी काढून टाकावे.
 • मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ, जिरे, मिरची, कोथिंबीर, आले, लसूण एकदम बारीक करून घ्यावे.
 • नंतर त्यामध्ये मूग घालून, किंचित पाणी घालून एकदम बारीक करून घ्यावे. रवाळ राहता कामा नये.
 • मग तवा तापला कि त्याला तेल लावून डोसा घालावा व झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा.
 • मुगाचा डोसा चटणी व सांबारबरोबर खायला घ्यावा.
 • हा डोसा अतिशय पौष्टिक असून लहान मुलांसाठीदेखील मधल्या वेळेतील खाऊ म्हणून छान आहे.