रंगीबेरंगी कोशिंबीर (Multicolor Vegetable Raita)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

रंगीबेरंगी कोशिंबीर

साहित्य:
 • गाजराचे चौकोनी तुकडे - १ वाटी
 • श्रावणघेवड्याचे मध्यम आकाराचे तुकडे - अर्धी वाटी
 • कॉलीफ्लॉवरचे बारीक तुकडे - १ वाटी
 • गोड दही - १ वाटी
 • मिरेपूड - चिमूटभर
 • तिखट - पाव टीस्पून
 • साखर - अर्धा टीस्पून
 • मीठ - चवीनुसार
 • फोडणीसाठी - १ चमचा तेल, मोहरी, जिरे , हिंग, हळद.
कृती:
 • गाजर, श्रावणघेवडा, कॉलीफ्लॉवर चे तुकडे एकत्र एका भांड्यात घेऊन कुकर ला २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावेत. वाफवताना पाव वाटी पाणी घालावे.
 • मग त्यामध्ये मिरेपूड, तिखट, मीठ, साखर घालावी.
 • वरून मोहरी, जिरे, हिंग व हळदीची फोडणी घालावी.
 • हे सर्व गार झाले कि दही घालून नीट एकजीव हलवून सर्व करावे.
 • अतिशय सोपी अशी हि रंगीबेरंगी कोशिंबीर खूप चवदार लागते.