मशरूम सिमला मिरची स्वीटकॉर्न मसाला (Mushroom Capsicum Corn Masala)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • May 28, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

मशरूम सिमला मिरची स्वीटकॉर्न मसाला

साहित्य:
 • १०० ग्रॅम बटण मशरूम्स
 • १ मध्यम आकाराची सिमला मिरची
 • १०० ग्रॅम उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे
 • २ मध्यम आकाराचे कांदे
 • २ मध्यम आकाराचे टोमॅटो
 • ३-४ लसूणपाकळ्या
 • ८-१० काजू
 • अर्धा टीस्पून तिखट
 • पाव टीस्पून हळद
 • अर्धा टीस्पून साखर
 • १ टीस्पून मीठ
 • २ तमालपत्रे
 • ३ चमचे तेल
 • मसाला : २ टीस्पून जिरे, ३-४ दालचिनीचे तुकडे, १ चक्रीफूल
कृती:
 • मशरूम स्वच्छ धुवून, त्याचे खालचे थोडे देठ कापून निथळत चाळणीमध्ये ठेवावे.
 • जिरे, चक्रीफूल, दालचिनी मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पूड करून घ्यावी. हा भाजीचा मसाला आहे.
 • कढई मध्ये दीड चमचा तेल घेऊन ते तापले कि त्यामध्ये १ कांदा टाकून गुलाबी परतावा.
 • मग त्यामध्ये टोमॅटो, काजू, लसूणपाकळ्या, तिखट, हळद, मीठ, साखर टाकून, टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवावे.
 • हे गार झाले कि मिक्सर मधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यावी.
 • १ कांदा व सिमला मिरचीचे चौकोनी मोठे तुकडे करून घ्यावे.
 • एका कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करून त्यात तमालपत्र टाकावे.
 • मग त्यात चौकोनी चिरलेला कांदा टाकून २-३ मिनिटे फ्राय करावे.
 • मग त्यामध्ये सिमला मिरची, कॉर्न टाकून २-३ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये मशरूम आणि मसाला टाकून २ मिनिटे परतावे.
 • नंतर त्यामध्ये कांदा-टोमॅटोची पेस्ट टाकावी.
 • मग १ ते दीड वाटी पाणी घालून १०-१५ मिनिटे झाकण ठेवून शिजवावे.