नारळीभात (Coconut Sweet Rice)

 • Post by Priyanka
 • Dec 19, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

नारळीभात

साहित्य:
 • १ वाटी तांदूळ,
 • १ वाटी चिरलेला गूळ (तांदुळापेक्षा किंचित कमी),
 • अर्ध्या नारळाचा चव,
 • काजू,
 • बदाम,
 • बेदाणे,
 • विलायची,
 • ४-५ लवंगा,
 • २ टीस्पून साजूक तूप,
 • अर्धा चमचा मीठ.
कृती:
 • तांदूळ धुवून, २ चमचे तुपात लवंगांबरोबर परतून मोकळा भात शिजवून घ्यावा.
 • भात शिजवताना त्यात अर्धा चमचा मीठ घालावे.
 • एका कढईमध्ये चिरलेला गूळ घेऊन, त्यात गूळ बुडेपर्यंत पाणी घालून एकसारखे हलवत पाक करावा.
 • पाकाला थोडासा फेस आला कि त्यात नारळाचा चव घालून ३-४ मिनिटे परतावे.
 • मग त्यात विलायची पूड, बेदाणे, काजू, बदामाचे काप घालून नीट हलवावे.
 • त्यानंतर त्यात शिजवलेला भात टाकून, नीट हलवून ७ ते ८ वाफा काढाव्या.
आंब्याचा भात: हापूस आंब्याचा भात
तवा पुलाव: तवा पुलाव