पालक खिचडी (Spinach Rice)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Feb 15, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

पालक खिचडी

साहित्य:
 • १ वाटी तांदूळ
 • १ वाटी मूगडाळ
 • २ टीस्पून जिरे
 • २ वाट्या बारीक चिरलेला पालक
 • मसाल्यासाठी: ३ लवंगा, ३-४ दालचिनीचे तुकडे, ५-६ मिरे
 • पाव टीस्पून तिखट
 • चवीनुसार मीठ
 • १ टीस्पून आले लसूण पेस्ट
 • फोडणीसाठी: २ चमचे साजूक तूप, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मोहरी
कृती:
 • प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवावे.
 • मिरे, लवंगा, दालचिनीची मिक्सर मधून बारीक पूड करून घ्यावी. हा खिचडीसाठीचा मसाला आहे.
 • कुकरमध्ये तूप टाकून, ते गरम झाले कि मोहरी, जिरे, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्यावी.
 • मग त्यामध्ये आले लसूण पेस्ट, पालक टाकून २-३ मिनिटे परतून घ्यावे.
 • मग त्यामध्ये तिखट व खिचडीचा मसाला टाकून १-२ मिनिटे परतावे.
 • नंतर त्यामध्ये तांदूळ टाकून, २-३ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये अडीच ते तीन ग्लास पाणी, मीठ टाकून चांगले ढवळावे.
 • पाण्याला उकळी आली कि मग कूकर चे झाकण लावून ४-५ शिट्ट्या कराव्यात.