पालक पनीर (Palak Paneer)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

पालक पनीर

साहित्य:
 • १ मध्यम आकाराची पालकाची जुडी,
 • १ मध्यम आकाराचा कांदा,
 • ६-७ काजू,
 • १ मोठी मिरची,
 • ४-५ लसूण पाकळ्या,
 • १ इंच आले,
 • १ छोटा चमचा गरम मसाला,
 • १ टीस्पून साखर,
 • १ चमचा धने-जिरे पूड,
 • दीड चमचा तेल,
 • १२५ ग्रॅम पनीर,
 • चवीनुसार मीठ
कृती:
 • पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यावा.
 • एका कढई मध्ये १ वाटी पाणी घेऊन त्यात पालक व मिरची ५-७ मिनिटे झाकण ठेऊन उकळणे.
 • हे थंड झाल्यावर मिक्सरमधून पालक प्युरी करून घेणे.
 • कांदा मोठा चिरून मिक्सरमधून त्याची प्युरी करून घेणे.
 • कढई मध्ये दीड चमचा तेल घालून त्यात कांद्याची प्युरी घालून ५-७ मिनिटे परतणे.
 • मग त्यात आले व लसणाची पेस्ट घालून २-४ मिनिटे परतणे.
 • मग त्यात पालक प्युरी घालून छान ढवळणे व १ ते दीड वाटी पाणी घालणे.
 • नंतर त्यात धने जिरे पूड, काजूची पूड, गरम मसाला, साखर व चवीनुसार मीठ घालून उकळी आणणे.
 • त्यानंतर पनीर चे क्युब्स टाकून झाकण ठेवून भाजी १०-१५ मिनिटे शिजवणे.