पॅनकेक (Pancake)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • May 25, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

पॅनकेक

साहित्य:
 • १ वाटी कणिक
 • पाव टीस्पून बेकिंग पावडर
 • दीड कप दूध
 • २ टेबलस्पून साजूक तूप
 • अडीच टीस्पून साखर
 • १ अंडे फेटून
 • २ थेम्ब वॅनिला इसेन्स
कृती:
 • तूप गरम करून घ्यावे
 • मग त्यामध्ये साखर, कणिक, बेकिंग पावडर व कोमट दूध घालून छान फेटून घ्यावे
 • मग त्यामध्ये फेटलेले अंडे घालून, सर्व मिश्रण अजून छान फेटून घ्यावे
 • पीठ इडलीच्या पिठाइतकेच पातळ असावे
 • मग नॉनस्टिक पॅनला तूप लावून, मंद आचेवर फुलक्याएवढा पॅनकेक घालावा
 • एका बाजूने गुलाबीसर भाजला कि मग दुसऱ्या बाजूने पण तसाच भाजून घ्यावा
 • पॅनकेक भाजताना झाकण ठेवू नये