पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala)

 • Post by Priyanka
 • Dec 12, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

पनीर बटर मसाला (३ माणसांसाठी)

साहित्य:
 • २ मोठे टोमॅटो,
 • २ मोठे कांदे,
 • ८-१० काजू,
 • लसणाच्या ३-४ पाकळ्या,
 • अर्धा इंच आल्याचा तुकडा,
 • तेजपत्त्याची दोन पाने,
 • दीड चमचा बटर,
 • २ चमचे तेल,
 • दीड टीस्पून साखर,
 • पाव टीस्पून तिखट,
 • पाव टीस्पून हळद,
 • १२५ ग्रॅ पनीर,
 • चवीनुसार मीठ.
सुका मसाला साहित्य:
 • १ चक्रीफूल,
 • २ लवंगा,
 • दालचिनीचे २-३ तुकडे,
 • ४-५ वेलदोडे,
 • अर्धा टीस्पून धने,
 • पाव टीस्पून,
 • जिरे.
कृती:
 • सुक्या मसाल्याचे साहित्य मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यावे.
 • टोमॅटो व कांद्याच्या मोठ्या फोडी करून घेणे.
 • कढईमधे १ चमचा तेल टाकून, ते तापल्यावर त्यात कांदा टाकून २ मिनिटे परतावे.
 • मग त्यात टोमॅटो, काजू, तिखट, हळद, मीठ, साखर, तेजपत्ता, आले व लसूण टाकून, झाकण ठेवून ७-८ मिनिटे शिजवणे.
 • हे सर्व गार झाले कि मिक्सर मधून बारीक फिरवून प्युरी करून घ्यावी.
 • नंतर कढईमधे बटर व तेल एकत्र टाकून, ते तापल्यावर सुका मसाला टाकून २-३ मिनिटे परतून घेणे.
 • मसाल्याचा खमंग वास आल्यावर त्यामध्ये प्युरी टाकून, तेल सुटेपर्यंत साधारणपणे ४-५ मिनिटे परतणे.
 • नंतर त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकावे.
 • भाजीला उकळी आली कि मग त्यामध्ये पनीर चे चौकोनी तुकडे टाकून १०-१५ मिनिटे भाजी झाकण ठेवून शिजवणे.
 • भाजी शिजवताना मधून मधून हलवावी.