पनीर दो प्याजा (Paneer Do Pyaza)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

पनीर दो प्याजा

साहित्य:
 • ४ मध्यम आकाराचे कांदे, २ मोठे कांदे
 • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
 • १ मोठी सिमला मिरची
 • २०० ग्रॅम पनीर
 • १/२ टीस्पून जिरे
 • १/२ टीस्पून मिरपूड
 • २-३ वेलदोडे
 • १/२ टीस्पून जिरेपूड
 • २ टीस्पून धणेपूड
 • १/४ टीस्पून हळद
 • १ टीस्पून काश्मिरी तिखट
 • ४ चमचे तेल
 • १ तमालपत्र
 • १ चक्रीफूल
 • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
 • कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती:
 • कढईमध्ये दोन चमचे तेल टाकावे.
 • तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे, मिरपूड आणि वेलदोडे टाकून १०-२० सेकंद परतून घ्यावे.
 • मग त्यामध्ये एकदम बारीक चिरलेले ४ मध्यम कांदे घालावेत आणि गुलाबीसर परतून घ्यावे.
 • मग त्यामध्ये तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड घालून ५ मिनिटे परतावे.
 • नंतर त्यामध्ये उभी पातळ चिरलेली सिमला मिरची घालून ५ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धी वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून साधारणपणे १० मिनिटे शिजवावे.
 • हे मिश्रण थंड झाले कि मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे. हि भाजीची ग्रेव्ही आहे.
 • नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन ते तापले कि त्यामध्ये तमालपत्र व चक्रीफूल घालावे.
 • मग त्यामध्ये २ कांदे, मोठे चौकोनी तुकडे करून घालावेत आणि परतत राहावे.
 • २ मिनिटांनी आले-लसूण पेस्ट घालावी.
 • कांदा किंचित गुलाबीसर झाला कि मग त्यामध्ये पनीरचे चौकोनी तुकडे घालावेत.
 • मग हे सर्व ५ मिनिटे परतून त्यामध्ये आपण आधी तयार केलेली ग्रेव्ही घालावी.
 • मीठ कमी असल्यास थोडे मीठ टाकावे. आणि पाव वाटी पाणी घालून झाकण ठेवून हि भाजी १० मिनिटे शिजवावी.
 • भाजी शिजवताना मधून मधून ढवळावी.
 • भाजी झाल्यावर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, खायला घ्यावी.