पनीर पराठा (Paneer Paratha)

post-thumb

Coming soon… Stay tuned.

पनीर पराठा

साहित्य:
 • २०० ग्रॅम मलई पनीर
 • १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
 • मूठभर कोथिंबीर
 • मीठ चवीनुसार
 • तिखट - अर्धा टीस्पून
 • गरम मसाला - अर्धा टीस्पून
 • धनेपूड - अर्धा टीस्पून
 • आमचूर - अर्धा टीस्पून
 • कसूरी मेथी - २ टीस्पून
 • ३ वाट्या कणिक
 • तेल - भाजण्यासाठी
कृती:
 • ३ वाट्या कणिक घेऊन, त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ व एक चमचा तेल घालून, पोळीसाठी मळतो तशी कणिक मळून झाकून ठेवावी.
 • पनीर धुवून नीट कुस्करून घ्यावे.
 • मग त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, आमचूर, धनेपूड, तिखट, गरम मसाला व कसूरी मेथी चुरून घालावी.
 • हे सर्व नीट मिसळून, थोडेसे मळून घ्यावे.
 • वरील सारण कणकेमध्ये भरून, हलक्या हाताने पराठे लाटावेत व तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.
 • ह्या प्रमाणामध्ये साधारणपणे मध्यम आकाराचे ७-८ पराठे होतील.
comments powered by Disqus
TAG