परवलाची भाजी (Parwal bhaji)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Dec 21, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

परवलाची भाजी

साहित्य:
 • पाव किलो परवल,
 • १ मध्यम आकाराचा बटाटा,
 • १ टीस्पून धने पूड,
 • अर्धा टीस्पून जिरे पूड,
 • अर्धा टीस्पून आमचूर पावडर,
 • अर्धा टीस्पून साखर,
 • थोडीशी कोथिंबीर,
 • पाव टीस्पून तिखट,
 • चवीप्रमाणे मीठ,
 • फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.
कृती:
 • परवल स्वच्छ धुऊन त्याची वरची साले सुरीने खरवडून घ्यावी.
 • आणि परवलाचे पातळ उभे काप करून घ्यावे.
 • तशाच प्रकारे बटाटा साले काढून उभा चिरून घ्यावा.
 • तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्यावी.
 • मग त्यामध्ये चिरलेला बटाटा घालून तिखट व मीठ घालावे, आणि गॅस मोठा करून २-४ मिनिटे परतावे.
 • त्यानंतर त्यामध्ये चिरलेले परवल घालून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
 • मग त्यात आमचूर पावडर, धने पावडर, जिरे पावडर, साखर घालून किंचित पाणी शिंपडावे.
 • आणि भाजी छान खरपूस होईपर्यंत १५ ते २० मिनिटे शिजवावी.
 • मधून मधून भाजीला सतत हलवत राहावे.
 • नंतर गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व करावी.