पोहा बटाटा कटलेट (Poha Batata Cutlet)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jun 15, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

पोहा बटाटा कटलेट

साहित्य:
 • १ वाटी जाड पोहे
 • ४ मध्यम आकाराचे बटाटे
 • ५-६ लसूणपाकळ्या
 • १ इंच आल्याचा तुकडा
 • मूठभर कोथिंबीर
 • अर्धा टीस्पून तिखट
 • १ टीस्पून मीठ
 • पाव टीस्पून हळद
 • १ टीस्पून जिरेपूड
 • १ टीस्पून धनेपूड
 • अर्धा टीस्पून चाट मसाला
 • पाव टीस्पून मिरेपूड
 • तेल ३-४ चमचे
कृती:
 • पोहे नीट चाळून, धुवून १५-२० मिनिटे निथळत ठेवावे.
 • बटाटे मऊ उकडून, साले काढून कुस्करून घ्यावे.
 • मग पोहे, कुस्करलेले बटाटे, तिखट, मीठ, हळद, धणेपूड, जिरेपूड, मिरेपूड, चाट मसाला, किसलेले आले व लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र एका भांड्यात घेऊन, छान मळून घ्यावे.
 • मग ह्याचे छोटे गोळे करून, चपटे थापून, तव्यावर दोन्ही बाजून सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करावेत.
 • शॅलो फ्राय करताना झाकण ठेवावे.