पुरणपोळी (Puran Poli)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Dec 22, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

पुरणपोळी

साहित्य:
 • १ वाटी हरभरा डाळ,
 • १ वाटी चिरलेला गूळ (डाळीपेक्षा किंचित जास्त),
 • १ टीस्पून मीठ,
 • ३ चमचे गोडे तेल,
 • अर्धा टीस्पून हळद,
 • विलायची,
 • २ ते अडीच वाटया कणिक (साधारणपणे ४ साध्या पोळ्या होतील एवढी).
कृती:
 • पुरण: हरभऱ्याच्या डाळीत तिप्पट पाणी,

 • अर्धा चमचा गोडे तेल, पाव टीस्पून हळद घालून, छोट्या कुकर मध्ये ५-६ शिट्ट्या करून डाळ मऊ शिजवून घेणे.

 • मग डाळ छान घोटून घेऊन त्यात चिरलेला गूळ, पाव टीस्पून मीठ घालून नीट हलवावे.

 • पुरण पूर्ण एकजीव होईपर्यंत नीट शिजवणे.

 • गॅस बंद करून त्यात विलायचीची पूड टाकावी.

 • कणिक: कणिक घेऊन त्यात, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून मीठ व १ चमचा गोडे तेल घालून घट्ट मळून अर्धा तास ठेवावे.

 • मग एक वाटी पाणी घेऊन त्यात अर्धा टीस्पून मीठ विरघळवून, ते पाणी लावून लावून कणिक थोडी सैल करावी.

 • नंतर वरून दीड चमचे तेल टाकावे. आणि मग कणकेत पुरण भरून पुरणपोळ्या कराव्यात.

टीप: पुरणपोळ्या लाटताना वरून लावण्यास तांदुळाची पिठी वापरावी.