राजमा (Rajma)

post-thumb
English
Marathi

राजमा

साहित्य:
 • १ वाटी राजमा
 • २ मध्यम आकाराचे टोमॅटो
 • २ मध्यम आकाराचे कांदे
 • ३-४ लसूणपाकळ्या
 • इंचभर आल्याचा तुकडा
 • २ टीस्पून धणेपूड
 • १ टीस्पून गरम मसाला
 • अर्धा टीस्पून काश्मिरी तिखट
 • २ टीस्पून कसूरी मेथी
 • पाव टीस्पून हळद
 • १ तमालपत्र
 • अर्धा टीस्पून जिरे
 • २ चमचे साजूक तूप
 • मीठ चवीनुसार
 • पाव टीस्पून साखर
कृती:
 • राजमा धुवून, साधारणपणे ८ तास भिजत ठेवावा.
 • मग त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ व राजमा नीट बुडेल इतके पाणी घालून कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून शिजवून घ्यावा.
 • मिक्सरमध्ये आले, लसूण व कांद्याच्या फोडी टाकून नीट बारीक करून घ्यावे.
 • कढईमध्ये तूप घेऊन ते तापले कि त्यामध्ये, जिरे व तमालपत्र टाकावे.
 • जिरे तडतडले कि मग त्यामध्ये आले-लसूण, कांद्याची पेस्ट टाकावी. आणि गुलाबीसर होईपर्यंत ७-८ मिनिटे परतावी.
 • मग त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालावी आणि थोडे मीठ टाकून ५-७ मिनिटे झाकण ठेवून शिजवावे.
 • नंतर त्यामध्ये तिखट, साखर, धणेपूड, हळद टाकून नीट हलवून घ्यावे आणि झाकण ठेवून अजून २-३ मिनिटे शिजवावे.
 • आता ह्यामध्ये शिजवलेला राजमा घालून नीट मिक्स करून घ्यावे. गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालावे.
 • नंतर झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
 • मग ह्यामध्ये गरम मसाला, कसूरी मेथी, बारीक चिलेली कोथिंबीर घालावी. आणि झाकण ठेवून अजून ५ मिनिटे शिजवावे.
 • गरम गरम राजमा भात किंवा पोळीबरोबर खूप छान लागतो.