रसगुल्ला (Rasgulla)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

रसगुल्ला

साहित्य:
 • १ लिटर गाईचे दूध,
 • १ मध्यम आकाराचे लिंबू,
 • १ वाटी साखर,
 • १ ग्लास पाणी,
 • ३-४ थेंब आपल्या आवडीचा इसेन्स.
कृती:
 • दूध तापवून घ्यावे व ५ मिनिटे सेटल व्हायला ठेऊन द्यावे.
 • मग त्यात एका लिंबाचा रस पिळून चमच्याने ढवळून घ्यावे आणि थोडा वेळ ठेवून द्यावे, म्हणजे दूध फाटेल.
 • फाटलेले दूध थोडे गार झाले कि मग त्यातील पाणी काढून टाकून, घट्ट झालेला भाग पाण्याखाली छान धुवून घ्यावा, जेणेकरून लिंबाची चव राहणार नाही.
 • आणि मग एका फडक्यात बांधून अर्धा तास टांगून ठेवणे.
 • तोपर्यंत पाक तयार करून घ्यावा.
 • पाक तयार करण्यासाठी भांड्यामधे १ वाटी साखर घेऊन त्यात एक ग्लास पाणी घालावे.
 • आणि मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत एकसारखे ढवळत राहावे.
 • साखर पूर्ण विरघळली कि मग गॅस बंद करून इसेन्स टाकावा.
 • नंतर फडक्यातील घट्ट झालेला गोळा एका ताटात घेऊन छान मळावा व त्याचे छोटे छोटे एकसारखे गोळे करून पाकात टाकावे.
 • सर्व गोळे पाकात टाकून झाल्यावर मग गॅसवर मंद आचेवर रसगुल्ले १५-२० मिनिटे झाकण न ठेवता शिजवणे.