Mix Veg Handi - मिक्स व्हेज हंडी

Publish Date: 2020-07-17 By: Priyanka
Share on Facebook
Share on Twitter
Share on WhatsApp
prep time 20 mins
cook time 40 mins
total servings 4 people
Mix Veg Handi - मिक्स व्हेज हंडी

साहित्य

  • कॉलीफ्लॉवरचे तुरे - १ वाटी
  • कांद्याचे चौकोनी मोठे तुकडे - १ वाटी
  • गाजराचे चौकोनी तुकडे - १ वाटी
  • सिमला मिरचीचे चौकोनी मोठे तुकडे - १/४ वाटी
  • मटारचे दाणे - १/२ वाटी
  • पनीर - १०० ग्रॅम
  • तेल - १ १/२ चमचा
  • हळद - १/४ टीस्पून
  • तमालपत्र - २
  • कसूरी मेथी - २ टीस्पून
  • कोथिंबीर - सजावटीसाठी

मसाला :

  • जिरे - १ टीस्पून
  • दालचिनीचा २ इंचाचा तुकडा
  • चक्रीफूल - १
  • वेलदोडे - २
  • लवंगा - ४

ग्रेव्ही :

  • मध्यम आकाराचे टोमॅटो - ४
  • मध्यम आकाराचे कांदे - ३
  • लसूणपाकळ्या - ५-६
  • काजू - ८-१०
  • आले - १ इंचाचा तुकडा
  • तिखट - १/२ टीस्पून
  • साखर - २ टीस्पून (चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता)
  • मीठ - १ १/२ टीस्पून (चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता)
  • तेल - १ १/२ चमचा

कृती

मसाला:

  • जिरे, दालचिनी, वेलदोड्याचे दाणे, लवंगा आणि चक्रीफूल एकत्र एका कढईमध्ये घेऊन, २-३ मिनिटे छान भाजून घ्यावे.
  • मग मिक्सरमधून ह्याची बारीक पूड करून घ्यावी.
  • हा आपल्या भाजीचा मसाला एका ताटलीमध्ये काढून घेऊन बाजूला ठेवावा.

ग्रेव्ही:

  • कढईमध्ये दीड चमचा तेल घेऊन ते तापले कि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, लसणाचे व आल्याचे तुकडे घालावेत.
  • कांदा थोडा गुलाबी झाला कि त्यामध्ये उभे चिरलेले टोमॅटो टाकून, झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
  • टोमॅटो थोडे मऊ झाले कि त्यामध्ये काजू, तिखट, मीठ व साखर घालावे.
  • पुन्हा झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे. मधून मधून झाकण उघडून हलवत राहावे.
  • टोमॅटो नीट मऊ झाले व त्याची साले नीट सुटली कि गॅस बंद करावा.
  • हे थंड झाले कि मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी. पेस्ट करताना पाणी टाकू नये.
  • हि आपल्या भाजीची ग्रेव्ही आहे.

भाजी :

  • कढईमध्ये दीड चमचा तेल घेऊन, ते तापल्यावर त्यामध्ये तमालपत्र टाकावे.
  • मग त्यामध्ये चौकोनी चिरलेला कांदा टाकावा आणि २-३ मिनिटे परतावे.
  • नंतर सिमला मिरची, गाजर, कॉलीफ्लॉवरचे तुकडे टाकून २-३ मिनिटे परतावे.
  • मग फ्रोझन मटार, पनीरचे तुकडे टाकावेत.
  • वरून ग्रेव्ही टाकून, व्यवस्थित हलवून, त्यामध्ये साधारणपणे १ ग्लास पाणी घालावे. व झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
  • मग त्यामध्ये आपण तयार केलेला भाजीचा मसाला, हळद टाकून नीट ढवळून घ्यावे. आणि झाकण ठेवून साधारणपणे १५-२० मिनिटे शिजवावे.
  • भाजी शिजवताना मधून मधून हलवत राहावे.
  • भाजी शिजली कि गॅस बंद करून, कसूरी मेथी चुरून टाकावी.
  • वरून कोथिंबिरीने सजवून भाजी सर्व्ह करावी.

Comments on this Page

Please share your comment on the post

Your details are safe with us and only your message and First Name will be listed in Comments. Other details will only be used to contact you, if you mentioned it.

Priyanka Aradhye

Priyanka Aradhye

#Author, #Blogger, #Health #Lifestyle

Hi, I am Priyanka. I am a statistician and a blogger. I love things related to a healthy lifestyle. Follow me for more. @chilli_clove.
Top