प्रथम कणिक व मैदा चाळून घेणे व त्यात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा मिसळून घेणे.
मग हे एका पातेल्यात घेऊन त्यात पिठी साखर, साय, व व्हॅनिला एसेन्स टाकून सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत एका बाजूने फेटणे.
रिंग व शिट्टी काढून पाणी न टाकता कुकर गरम करायला लावणे.
केक च्या भांड्याला तुपाचा हात लावून वरून थोडा मैदा भुरभुरावा व भांडे उलटे करून त्यास टिचकी मारावी म्हणजे जास्तीचा मैदा राहणार नाही.
हे भांडे कुकर बरोबर गरम करायला ठेवावे.
भांडे गरम झाले कि त्यात छान फेटलेले केक चे मिश्रण ओतावे व कुकर मध्ये साधारण पणे पाऊण तास ठेवावे.
Comments on this Page
Please share your comment on the post
Your details are safe with us and only your message and First Name will be listed in Comments. Other details will only be used to contact you, if you mentioned it.