रेड सॉस पास्ता (Red Sauce Pasta)

  • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
  • Jan 30, 2020
  • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

रेड सॉस पास्ता

साहित्य:
  • २ वाट्या पास्ता
  • ४ वाट्या पाणी
  • अर्धा चमचा गोडेतेल
  • दीड चमचे ऑलिव्ह ऑइल
  • १ टीस्पून मीठ
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • पाव टीस्पून तिखट
  • १ टीस्पून साखर
  • दीड टेबलस्पून टोमॅटो केचप
  • १ टीस्पून मिक्सड हर्ब्स
  • चीज १ क्यूब
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • एका पातेल्यात ४ वाट्या पाणी घेऊन, त्यामध्ये तेल व मीठ टाकून त्याला उकळी आणावी.
  • नंतर त्यामध्ये पास्ता टाकून नीट शिजवून घ्यावा. पास्ता शिजला कि नाही हे बघण्यासाठी चमच्याने मोडून बघावा. एकदम मऊ पण शिजवू नये.
  • पास्ता शिजला कि लगेच चाळणी मध्ये टाकून त्यावर गार पाणी ओतावे.
  • नंतर नॉनस्टिक कढईमधे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात कांद्याची प्युरी टाकावी.
  • ते गुलाबीसर झाले कि मग त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकावी.
  • २-३ मिनिटे परतून त्यात पाव वाटी पाणी टाकावे.
  • मग त्यात साखर, मिक्सड हर्ब्स, तिखट व चवीनुसार मीठ टाकावे. हे सर्व ५ मिनिटे शिजवून घ्यावे.
  • मग त्यामध्ये टोमॅटो केचप टाकून नीट हलवून घ्यावे.
  • नंतर गॅस बंद करून शिजवलेला पास्ता टाकून नीट सर्व मिक्स करून घ्यावे.
  • नंतर गॅस लावून पास्ता ४-५ मिनिटे परतून घ्यावा.
  • गॅस बंद करून, वरून चीज किसून घालावे, व गरम गरम पास्ता खावयास घ्यावा.
Pasta: पास्ता