शेवयाची खीर (Semiya Kheer)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Aug 10, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

शेवयाची खीर

साहित्य:
 • अर्धी वाटी शेवया
 • ४.५ वाट्या दूध
 • अर्धी वाटी साखर
 • २ चमचे साजूक तूप
 • बेदाणे, बदामाचे काप, काजूचे तुकडे, २-३ वेलदोड्याची पूड
कृती:
 • दूध तापायला ठेवावे.
 • तोपर्यंत एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून, त्यामध्ये शेवया भाजायला घ्याव्यात.
 • शेवया गुलाबी रंगावर भाजून, त्यामध्ये उकळी आलेले दूध घालावे.
 • आणि मग मंद आचेवर २५-३० मिनिटे खीर शिजू द्यावी. झाकण ठेवू नये.
 • एखादी शेवई चमच्याने टोचून पाहावी, सहज तुटत असेल तर गॅस बंद करावा.
 • गॅस बंद केला कि साखर घालून नीट ढवळून घ्यावे.
 • वरून विलायची पूड, बेदाणे, काजू-बदामाचे तुकडे घालून खीर खायला घ्यावी.