सोया चंक्स मसाला (Soya Chunks Masala)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jun 02, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

सोया चंक्स मसाला

साहित्य:
 • ५० ग्रॅम सोया चंक्स
 • २ मोठे टोमॅटो
 • २ मध्यम आकाराचे कांदे
 • १ इंच आल्याचा तुकडा
 • ३-४ लसूणपाकळ्या
 • अर्धा टीस्पून तिखट
 • पाव टीस्पून हळद
 • १ टीस्पून जिरेपूड
 • १ टीस्पून धनेपूड
 • १ टीस्पून किचन किंग मसाला
 • १ टीस्पून मीठ
 • अर्धा टीस्पून साखर
 • २ चमचे तेल
 • कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती:
 • सोया चंक्स नीट बुडतील एवढे पाणी घेऊन त्यामध्ये, अर्धा टीस्पून मीठ टाकून ते पाणी उकळायला ठेवावे.
 • पाण्याला उकळी आली कि, त्यामध्ये सोया चंक्स टाकून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
 • सोया चंक्स चांगले फुगून येतील. मग एका चाळणीमध्ये सोया चंक्स काढून निथळायला ठेवावे.
 • सोया चंक्स पिळू नयेत.
 • २ टोमॅटो, १ कांदा, आले व लसूण मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट करून घ्यावे.
 • एका कांद्याचे उभे पातळ बारीक काप करून घ्यावेत.
 • मग एका कढईमध्ये २ चमचे तेल टाकून, ते गरम झाले कि कांद्याचे उभे काप तळून काढावेत.
 • मग त्याच तेलामध्ये कांदा-टोमॅटोची पेस्ट घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावी.
 • मग त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, साखर, धणेपूड, जिरेपूड, किचन किंग मसाला, तळलेला कांदा, सोया चंक्स टाकून नीट हलवून घ्यावे.
 • नंतर त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे.
 • मग गॅस बंद करून कोथिंबीर घालून सजवावे.