स्पॉंज डोसा (Sponge Dosa)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jun 21, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

स्पॉंज डोसा

साहित्य:
 • २ वाटी तांदूळ
 • पाऊण वाटी उडीद डाळ
 • पाव वाटी जाड पोहे
 • पाव वाटी साबुदाणा
 • अर्धा टीस्पून मेथीदाणे
 • २ टीस्पून मीठ
 • तेल
कृती:
 • तांदूळ, उडीद डाळ, जाड पोहे, साबुदाणा, मेथीदाणे हे सर्व पदार्थ एका पातेल्यात घेऊन, स्वच्छ धुवून घ्यावेत.
 • मग त्यामध्ये हे सर्व बुडून वर एक इंच इतके पाणी घालून, किमान ६ तास भिजवावे.
 • ६ तासांनंतर, हे सर्व मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यावे. बारीक करताना जास्त पाणी घालू नये.
 • मग हे मिश्रण ८ तास आंबण्यासाठी झाकून उबदार जागेत ठेवावे.
 • मिश्रण थोडेसे आंबट लागू लागले व फुगून वर आले कि लगेच फ्रिजमध्ये ठेवावे.
 • डोसे करायच्या वेळेस पिठामध्ये चवीनुसार मीठ व थोडे पाणी टाकून, पीठ सैलसर करून घ्यावे.
 • तव्याला तेल लावून मग त्यावर डोसा घालावा. डोसा घालताना हलक्या हाताने पीठ पसरवावे.
 • झाकण ठेवून, डोसा दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर भाजून घ्यावा. व गरम गरम सांबार आणि चटणी सोबत खायला द्यावा.
 • ह्या प्रमाणामध्ये साधारणपणे ११-१२ डोसे होतील.